राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा 2018 मध्ये गरुड महाविद्यालयाची कु. मनीषा चौधरी प्रथम
कर्नूल आंध्र प्रदेश येथे सुरू असलेल्या 64 व्या राष्ट्रीय शालेय 19 वर्षां आतील वेटलिफ्टिंग स्पर्धेत श्री गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे शिकणारा रावेर येथील दुर्गेश सुनील महाजन याने 73 किलो वजनी गटात 242 किलो वजन उचलून सुवर्ण पदक पटकाविले
दि.29 सप्टेंबर 2022 रोजी गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी येथे विद्यापीठ स्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन...
सहभागाचे आवाहन विद्यार्थी विकास विभाग, गरुड महाविद्यालय शेंदुर्णी Download File
सुवर्ण संधी - पदव्युत्तर(एम.ए,एमबीए )अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया - सुवर्ण संधी
शेन्दुर्णी व शेन्दुर्णी परिसरातिल उच्च शिक्षण घेऊ इच्छिणा-या बंधु- भगिनी यांना विनंती आहे की आमच्याकडे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अन्तर्गत या वर्षी पासुन एम.ए.मराठी,हिंदी,इंग्रजी,अर्थशास्त्र व एम बीए, अभ्यासक्रमाची सुरूवात करण्यात आली आहे.आपण या सेवेचा लाभ घेऊन लवकरच आपला प्रवेश घ्यावा.
प्रवेशासाठी संपर्क- -प्रा.डॉ.संजय वामनराव भोळे, केंद्र संयोजक
9421516980
प्रा.डॉ .अजिनाथ जिवरग
केंद्र सहायक
8308091886
प्रा.प्रमोद सोनवणे
केंद्र सहायक
9325411435
प्रा.डॉ.वसंत पतंगे -अर्थशास्त्र
8805847541
प्रा.डॉ.दिनेश पाटील- इंग्रजी
9764598999
प्रा.योगेश पाटील- इंग्रजी
8390215755
प्रा.डॉ.आर.डी.गवारे -हिंदी
9637525680
प्रा.डॉ.भुषण पाटील- मराठी
9860002054
प्रा.श्रीमती वर्षा लोखंडे
9404050105
प्रा.डॉ.सौ.सुजाता पाटील - एम बीए
9763946971.
केंद्र प्रमुख
मा.प्राचार्य डॉ.वासुदेव रमेश पाटील
अप्पासाहेब र.भा गरूड महाविद्यालय,शेन्दुर्णी ता.जामनेर जि.जळगाव
शेंदूर्णी, दि.23/01/2021,शनिवार.
धी शेंदूर्णी सेकंडरी एज्युकेशन को-ऑप सोसायटी संचलीत, अप्पासाहेब र.भा. गरूड कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या,विद्यार्थी विकास विभाग व शेंदूर्णी नगरपंचायतिच्या वतीने ‘माझि वसुंधरा’ शपथ घेण्यात आली व नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती ‘शौर्य दिवस’ म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली.
23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र चंद्र बोस यांची 125 वी जयंती शौर्य दिन म्हणून साजरी करण्यात आली. सर्वप्रथम महाविद्यालयाचे उपप्राचार्य व इंग्रजी विभाग प्रमुख मा.प्रा.एन.एस.सावळे यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तसेच सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर प्रा.प्रमोद सोनवणे यांनी अभ्यासपूर्ण भाषणात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनपटाचा परिचय यांनी उलगडला.त्यांनी सुभाषचंद्र बोस यांच्या शौर्य गाथेबद्द्ल उपस्थित विद्यार्थ्यांना उद्बोधक वाणीतून प्रेरित केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.महेश आर.पाटील यांनी केले.
या नंतर “माझी वसुंधरा” शपथ घेण्यात आली.या कार्यक्रमाची प्रस्तावना नागरपंचायतीचे अभियंता श्री. लोकेश श्यामकांत साळी यांनी केली. त्यांनी माझी वसुंधरा अभियानाची रूपरेषा स्पष्ट करून उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यानंतर वरिष्ठ रासेयो एककाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी रासेयो स्वयंसेवक,विद्यार्थ्यांना व उपस्थित सर्वाना “माझी वसुंधरा” शपथ दिली. या कार्यक्रमाचे आभार ज्युनिअर विभागाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.दिपक पाटील यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमाला नागरपंचायती चे बांधकाम विभागाचे लिपिक श्री.दिनेश कुमावत, महाविद्यालयाचे उपप्राचार्य मा.प्रा.आर.जी.पाटील,प्रा.डॉ.एस.डब्लु.भोळे,प्रा.डॉ.श्याम साळुंखे,विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.ए.एन.जिवरग,प्रा.अमर व्ही.जावळे,प्रा.डॉ.पी.एस.देशमुख, प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे, प्रा.डॉ.सुजाता सी.पाटील,प्रा.डॉ.आर.डी.गवारे, प्रा.ए.एस.महाजन,प्रा.एस.जी.डेहेरकर,प्रा.निरुपमा वानखेडे, प्रा.वर्षा निकम, प्रा.छाया पाटील,प्रा.संदीप कुंभार,प्रा.रिना पाटील तसेच महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वृद,रासेयो स्वयंसेवक,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No loss ,No Profit Student Bus Sevice Provide by Managing Board Of Institute Student Bus Transport Service(SBTS)
Naac criteria II SSS ( Student satisfaction survey 2020-21 विद्यार्थी समाधान सर्वे
Naac criteria II SSS ( Student satisfaction survey 2020-21) विद्यार्थी समाधान सर्वे
सर्व विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येत आहे की ugc मार्गदर्शक तत्वानुसार विद्यार्थी समाधान सर्वे करणे अनिवार्य आहे या सुचनेसोबत सर्वे लिंक पाठवीत आहोत प्रत्येक विद्यार्थ्यांस हा फॉर्म भरणे अनिवार्य आहे, एका विद्यार्थ्यांस केवळ एकदाच हा फॉर्म भरता येईल त्यामुळे काळजीपूर्वक वाचन करूनच फॉर्म भरावा