गरूड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सत्यशोधक समाज स्थापना दिवस उत्साहात साजरा
शेंदुर्णी – दि. 24.09.2022 रोजी येथील अप्पासाहेब आर. बी. गरूड महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवस व सत्यशोधक समाज स्थापना दिवस साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते उपप्राचार्य डॉ. संजय भोळे यांनी आपल्या व्याख्यानातून राष्ट्रीय सेवा योजना स्थापण्याचा उद्देश, ब्रीदवाक्य अर्थ तसेच युवकांच्या व्यक्तीमत्व विकासात त्याचे स्थान विशद केले. तसेच सत्यशोधक समाज स्थापना उद्देश, विचार व महात्मा फुलेंचे कार्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान उपप्राचार्य प्रा.एन.एस. सावळे यांनी भूषविले. त्यांनी महात्मा गांधी आणि महात्मा फुले यांचे ग्रंथ वाचण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक डॉ.रोहिदास गवारे, सूत्रसंचालन प्रा.वर्षा लोखंडे, तर आभार प्रा. दीपक पाटील यांनी मानले. याप्रसंगी उपप्राचार्य श्याम साळुंखे, उपप्राचार्य अमर जावळे, उपप्राचार्य प्रा.ए.एस. महाजन, उपप्राचार्य प्रमोद सोनवणे, डॉ.दिनेश पाटील , डॉ. सुजाता पाटील, प्रा.संदीप कुंभार, प्रा. मुकेश पाटील, प्रा. छाया पाटील तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या वतीने यशस्वीपणे आयोजन करण्यात आले.
N.S.S.Day and Satyashodhak Samaj Foundation Day Celebration