गरुड महाविद्यालयामध्ये फीट इंडिया मुव्हमेंट कार्यक्रम संपन्न
महाविद्यालयाचा क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी फीट इंडिया मुमेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, उत्तम आरोग्यासाठी पायी चालणे हे नेहमीच फलदायी असते याचे महत्त्व प्राचार्य डॉ. व्ही.आर. पाटील यांनी सर्व विद्यार्थी आणि कर्मचारी यांना पटवून दिले तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी यांनी पाच किलोमीटरचा पायी प्रवास करून आरोग्य सदृढ राखण्याचा संदेश देऊन हा कार्यक्रम साजरा केला या वेळी उपप्राचार्य प्रा. एन. एस सावळे ,उपप्राचार्य डॉ.संजय भोळे,उपप्राचार्य डॉ,श्याम साळुंखे हे सहभागी होते या कार्यक्रमाचे आयोजन क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा संचालक महेश पाटील ,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.ए .एन.जिवरग, डॉ. योगिता चौधरी महिला सहा. विद्यार्थी विकास अधिकारी , डॉ. दिनेश पाटील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तसेच वसंत पतंगे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांनी परिश्रम घेतले याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा. अमर जावळे, प्रा. भुषण पाटील, डॉ.रोहिदास गवारे,डॉ .प्रशांत देशमुख, प्रा.प्रमोद सोनवणे, लक्ष्मण सोनवणे हे उपस्थित होते
महाविद्यालयाचा क्रीडा विभाग, विद्यार्थी विकास विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यावतीने आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी फीट इंडिया मुमेंट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले