महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत”वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत अ. र. भा. गरुड कला वाणिज्य आणी विज्ञान महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालय पंधरवाडा’ म्हणुन विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात येत असुन दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रमा अंतर्गत ग्रंथालयातर्फे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजीत कऱण्यात आले . यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भोळे यांच्या हस्ते फीत कापुन ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन कऱण्यात आले यावेळी उपप्राचार्य डॉ. श्याम साळुंखे, डॉ. अमर जावळे, प्रा . अप्पा महाजन, सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनिनी सहभाग नोंदविला. ग्रंथ प्रदर्शन 30 आणि 31 डिसेंबर 2024 पर्यंत दोन दिवस होते.कार्यक्रमाकरिता रा. से. यो एकक कार्यक्रम अधिकारी डॉ वसंत पतंगे, महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. सुजाता पाटील मॅडम, भाषा विभाग प्रमुख डॉ .दिनेश पाटील, डॉ . रोहिदास गवारे, डॉ. भुषण पाटील तसेच विद्यार्थी विकास कल्याण अधिकारी डॉ. आजिनाथ जिवरग यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रम आयोजनाकरिता ग्रंथपाल प्रा. धम्मा एच. धारगावे, तसेच सर्व ग्रंथालय सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.
Photo Gallery : अ. र.भा. गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम” अंतर्गत ग्रंथ प्रदर्शन कार्यक्रम उत्साहात साजरा