
राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धा 2018 मध्ये गरुड महाविद्यालयाची कु. मनीषा चौधरी प्रथम गोंद्वाना विद्यापीठ गडचिरोली येथे दिनांक 14 जानेवारी 2019 ते 18 जानेवारी 2019 या कालावधीत आयोजित राज्यस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेसाठी गरुड महाविद्यालय शेंदुर्णीच्या कु. मनीषा सुनील चौधरी आणि कु. पायल सुभाष बारी( प्रथम वर्ष वाणिज्य) या दोन विद्यार्थिनींची निवड झालेली होती. यापैकी दोघही विद्यार्थ्यांनी उत्तम कामगिरी बजावली. त्यात अंतिम निकालांमध्ये कु. मनीषा चौधरी (द्वितीय वर्ष वाणिज्य) हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मानव विद्याशाखा पदवी गटात प्राप्त केले. यापूर्वीही मनीषाने उमवि विद्यापीठ स्तरीय या स्पर्धेत आणि उदयपूर येथे झालेल्या वेस्ट झोन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे . तसेच तिची गुजरात येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली आहे. या यशासाठी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड, सचिव सागरमलजी जैन, सहसचिव श्री. दीपकभाऊ गरुड ,महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वासुदेव आर .पाटील सर, सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील यशासाठी शुभेच्छा दिल्या.