अ. र.भा. गरुड महाविद्यालय शेंदुर्णी येथे “वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम” स्वच्छता अभियान कार्यक्रमाने सुरुवात
महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत”वाचन संकल्प महाराष्ट्राचा” हया उपक्रमा अंतर्गत अ. र. भा. गरुड कला वाणिज्य आणी विज्ञान महाविद्यालयामध्ये ग्रंथालय विभागातर्फे ग्रंथालय पंधरवाडा’ म्हणुन विविध कार्यक्रम घेऊन उत्साहात साजरा करण्यात येत असुन दिनांक 29 डिसेंबर 2024 रोजी वाचन संकल्प महाराष्ट्राचा हया कार्यक्रमाची सुरुवात “महाविद्द्यालय ग्रंथालय स्वच्छता अभियान” कार्यक्रमाने करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय भोळे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन कऱण्यात आले. यावेळी सर्व उपप्राचार्य, प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी आणि विद्यार्थिनिनी सहभाग नोंदविला . याकरिता रा. से. यो एकक कार्यक्रम अधिकारी तसेच विद्यार्थी विकास कल्याण अधिकारी यांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी ग्रंथपाल प्रा. धम्मा एच. धारगावे, तसेच सर्व ग्रंथालय सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.
Photo Galery – 29 डिसेंबर 2024 रोजी ग्रंथालय स्वछता अभियान कार्यक्रम आयोजित केला