महाराष्ट्र शासन, उच्च व तंत्र शिक्षण विभाग “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” उपक्रमा अंतर्गत वाचन संवाद कार्यक्रमामध्ये (लेखक आणी वाचक (विद्यार्थि) संवाद) वाचन आणि लेखन करतांना साहित्याचे सिंहावलोकन आणि विहंगावलोकन , मनिमेखलाचा सिद्धांत हा वांगमयिन समीक्षात्मक निबंध लेखनासाठी महत्त्वाचे ठरते तसेच आकर्षक सुरूवात सूत्रबद्ध मांडणी, परिणामकारक शेवट ही समीक्षात्मक लेखनाची बलस्थाने आहेत असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
“वाचन आणि लेखनाच्या माध्यमातुन साहित्याची समीक्षा: सावित्रीबाई फुले एक व्यक्तिमत्व” या विषयावरती डॉ.भुषण डी. पाटिल यांचे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय भोळे हे अध्यक्ष स्थानी होते.त्यांनी आपल्या अध्यक्षीय समरोपातून वाचन आणि संवाद यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये चिकित्सक वृत्ती निर्माण होऊन साहित्याच्या क्षेत्रात यश संपादन करता येतो. तसेच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्त्रीशिक्षण विषयक मौलिक योगदान असुन त्यांची जयंती स्त्रीमुक्ती दिन म्हणुन उत्साहात साजरी करण्यात येतो असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी महान व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तींचे आत्मचरित्र नेहमी वाचन आणि चिंतन करणे आवश्यक आहे असे मार्गदर्शनपर विचार मांडले. तर ग्रंथपाल प्रा. धम्मा धारगावे यांनी आपल्या प्रास्ताविक मधुन वाचन आणि संवाद ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात निरंतर चालत राहणारी प्रक्रिया असुन विद्यार्थ्यांना ती सतत आत्मसात करून वाचनक्षमता वाढविण्यासाठी ग्रंथालय हे एक ज्ञान संसाधन केंद्र म्हणुन आपली महत्त्वाची भुमिका नेहमी पार पाडीत असते असे सांगितले.
यावेळी उपप्राचार्य डॉ.श्याम साळुंखे, उपप्राचार्य प्रा.डॉ.अमर जावळे, प्रा.डॉ.प्रशांत देशमुख, उपप्राचार्य प्रा.अप्पा महाजन, प्रा.प्रमोद सोनवणे, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.वसंत एन.पतंगे,विद्यार्थी विकास अधिकारी डॉ.योगिता चौधरी, डॉ.ए.एन.जिवरग, डॉ.आर.डी.गवारे, डॉ.सुजाता पाटील व सर्व प्राध्यापक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. तसेच जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थ्यांनी कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदविला. कार्यक्रम आयोजनाकरिता ग्रंथपाल प्रा.धम्मा एच.धारगावे, तसेच सर्व ग्रंथालय सहाय्यक यांनी परिश्रम घेतले.
Image Gallery : वाचन आणि लेखनाच्या माध्यमातुन साहित्याची समीक्षा: सावित्रीबाई फुले एक व्यक्तिमत्व