गरुड महाविद्यालय शेंदुर्णी ची विद्यार्थिनी कु.मनीषा सुनील चौधरी राष्ट्रीय स्तरावरील अन्वेषण संशोधन स्पर्धेत भारतातून प्रथम. ,अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णीची द्वितीय वर्ष वाणिज्य ची विद्यार्थिनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव यांच्या संघात गणपत विद्यापीठ मेहसाणा अहमदाबाद येथे तीन दिवसीय राष्ट्रीय अन्वेषण संशोधन स्पर्धेत सहभागी झालि होती. त्यामध्ये तिने सोशल सायन्स या गटात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मोमेंटो आणि रोख रक्कम रुपये 75, 000प्राप्त करून महाविद्यालयाचे नावलौकिकात मोठी भर घातली. सातत्याने वाढत जाणारे महिलांवरील अत्याचार कमी होण्यासाठी या विद्यार्थिनीने महिलांसाठी आणि त्यांच्या स्वसंरक्षणासाठी एक पाण्याची बॉटल बनविलेली आहे. Bedi – A safety bottle for women असे या बॉटल चे नाव तिने ठेवले आहे. BEDI म्हणजे Best Emergency Diffending Insrument . कामानिमित्त घराबाहेर राहणाऱ्या , नोकरीसाठी रोज अप-डाऊन करणाऱ्या, तसेच रात्री उशिरापर्यंत घराच्या बाहेर राहणाऱ्या सर्व महिला स्वतःच्या बळावर सुरक्षित रहाव्यात हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून तिने ही बॉटल बनवलेली आहे. ही 9 इन 1 अशी बॉटल आहे ज्यात तिने पिण्याचे पाणी, कटर, टॉर्च, सायरन, जीपीएस, करंट बटन इमर्जन्सी मेसेज सिस्टीम ऑटो कॉल रिसिव्ह फॅसिलिटी चिली स्प्रे यासारखे 9 स्वसंरक्षणाचे गॅझेट बसविलेले आहेत. ज्याच्या आधारे महिलेवर कोणतीही परिस्थिती आली तरी ती यातील कोणत्याही एका गॅझेट चा उपयोग परिस्थितीनुसार करून स्वतःचं संरक्षण स्वतः करू शकते. या बोटल साठी तिने पेटंट सुद्धा फाईल केलेले आहे. या समाज उपयोगी बॉटल साठी कु मनीषा चौधरी हिला कबचौ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ स्तरीय प्रथम पारितोषिक, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीतील राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक आणि उदयपूर येथे झालेला वेस्ट झोन मध्ये पाच राज्यांमधून सुद्धा प्रथम पारितोषिक प्राप्त झालेले आहे सदर बॉटल बनविण्यासाठी आणि आणि त्यांचे पेटंट फाईल करण्यासाठी प्रा. डॉ. योगिता पांडुरंग चौधरी, अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णी यांनी मेंटर म्हणून काम पाहिले . गरुड महाविद्यालयाने या अगोदरच बॉटल चे पेटंट फाइल केले आहे. प्राचार्य डॉ. वासुदेव रमेश पाटील यांनी संपूर्ण प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. सदर अभूतपूर्व यशासाठी संस्थेचे अध्यक्ष दादासाहेब संजयरावजी गरुड , सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव भाऊसाहेब दीपकजी गरुड, सर्व संचालक मंडळ , सभासद शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी सर्वांनी अभिनंदन केले आहे