July 15, 2024
Contact No. 02580-252246

THE SHENDURNI SECONDARY EDUCATION CO-OPERATIVE SOCIETY'S

APPASAHEB RAGHUNATHRAO BHAURAO GARUD ARTS, COMMERCE & SCIENCE COLLEGE, SHENDURNI

अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शेंदूर्णी

NAAC RE-ACCREDITED (3rd Cycle)'B+' GRADE With CGPA 2.63

Shendurni [Dist - Jalgaon]

गरुड महाविद्यालयात इंग्रजी विभागात उपक्रम

  • Date: Saturday, Sep 17, 2022
  • Time: 8:00 AM - 5:00 PM
  • Location: A.R.B. Garud College Shendurni
  • Event Category Depart. Of English
Featured Image

दि.17/09/2022,शनिवार
धी शेंदूर्णी सेकं.एज्यु.को-ऑप सोसा.संचालित अप्पासाहेब र.भा.गरुड कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागाच्या वतीने प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी चे आयोजन करण्यात आले होते.या उपक्रमात विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सांस्कृतिक व्यासपीठ उपलब्ध झाले.यातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांचा विकास होण्यास वाव मिळाला.या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उप-प्राचार्य व अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा.अमर जावळे हे होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंग्रजी विभाग प्रमुख डॉ.दिनेश प्रकाश पाटील यांनी केले.त्यांनी विभागामार्फत राबवित असलेल्या विद्यार्थी केंद्रित उपक्रमांचा आढावा घेतला.तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी साधन व्यक्ती म्हणून राणीदानजी कनिष्ठ महाविद्यालय वाकोद येथील प्रा.नितीन पाटील हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयात करियर विषयीच्या संधी बद्दल मार्गदर्शन केले व महाविद्यालयाचा इंग्रजी विभाग विद्यार्थ्यांच्या प्रगतीस कटिबद्ध असल्याचे प्रतिपादित केले. प्रमुख अतिथी म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा.डॉ.प्रशांत देशमुख हे होते.त्यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृती वाढविण्याचे पाईक होऊन वाचन व्यक्ती ला संस्कारक्षम बनविते असे सांगितले.अध्यक्षीय मनोगतात प्रा.अमर जावळे यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्व विकासात इंग्रजीचे महत्व पटवून दिले व विभागातील सर्व विद्यार्थ्यांना शब्दकोश घेऊन देण्यासाठी 5000 रु चा निधी उपलब्ध करून दिला.विद्यार्थीनी योगिता माळी हिने मनोगत व्यक्त केले.याबद्दल उपस्थित विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागाच्या विद्यार्थिनी कु.मुस्कान व कु.पल्लवी यांनी केले व आभार कु.सपना यांनी व्यक्त केले.सदरील उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.छाया पाटील व विभागातील सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.