
अप्पासाहेब रघुनाथराव भाऊराव गरुड कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शेंदुर्णीच्या नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघातर्फे दर वर्षी 26 जुलै हा दिवस दादासाहेब संजयजी गरुड यांच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थी प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. त्याच प्रमाणे याच दिवशी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा आयोजित केला जातो. मात्र संपूर्ण जगात कोरोना या जागतिक महामारीमुळे ह्या वर्षाचा माजी विद्यार्थी मेळावा घेणे शक्य नव्हतं. म्हणूनच माजी विद्यार्थी कार्यकारिणीच्या एक मताने झालेल्या ठरावानुसार शेंदुर्णी गावातील फुकट पुरा येथे राहणाऱ्या गरजू आणि गरीब लोकांना जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप करण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसारच संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब संजयरावजी गरुड, सचिव काकासाहेब सागरमलजी जैन, सहसचिव श्री. दीपक भाऊसाहेब गरुड, ज्येष्ठ संचालक श्री. यू. यु. दादा पाटील, प्रशासकीय अधिकारी श्री. संजयजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाने तसेच गरुड महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी यांच्या आर्थिक सहकार्याने 150 गरजू कुटुंबांना ही मदत देण्यात आली. सदर वेळी कै. प्रा. आर .पी. पाटील सर यांच्या स्मरणार्थ माजी विद्यार्थी संघाकडून दिला जाणारा उत्कृष्ट विद्यार्थ्याचा पुरस्कार चि.निलेश सरदार राठोड,लिहा या विद्यार्थ्यास त्याचे आई-वडील यांच्या उपस्थित त्यांच्या समवेत प्रदान करण्यात आला. श्रीमती तारा पाटील यांच्या आर्थिक मदतीतून हा पुरस्कार दिला जातो. माजी विद्यार्थी कार्यकारिणीचे अध्यक्ष प्राचार्य अरुणजी अहिरराव, मुंबई उपाध्यक्ष प्रा. सुनीलबापू गरुड, जळगाव, उपप्राचार्य एन.एस सावळे, यांच्या फोनवरील मार्गदर्शन आणि प्राचार्य. वासुदेव रमेशराव पाटील, सचिव – श्री. हितेन्द्रकुमार रमेशराव गरुड, सहसचिव -प्रा अमर वसंत जावळे, खजिनदार – प्रा.डॉ. योगिता पांडुरंग चौधरी यांच्या अथक परिश्रमातून सदर सामाजिक उपक्रम यशस्वी झाला.
माजी विद्यार्थी कार्यकारणी त्याचप्रमाणे बऱ्याच माजी विद्यार्थ्यांनी केलेल्या आर्थिक सहकार्याच्या बळावरच हा आगळावेगळा सामाजीक जाणिवेचे भान असणारा कार्यक्रम राबविण्यात आला.
सदर कार्यक्रमात माननीय दादासाहेब संजय रावजी गरुड यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा महाविद्यालयीन परिवाराकडून देण्यात आल्या. 150 कुटुंबांना देण्यात आलेल्या या मदतीच्या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्य सौ .सरोजनीताई संजयराव गरुड , माजी विद्यार्थी श्री. रवींद्र भाऊ गुजर, पत्रकार श्री. विलासभाऊ अहिरे, माजी विद्यार्थी पत्रकार ॲडव्होकेट देवेंद्रजी परळकर उपस्थित होते. माजी विद्यार्थी कार्यकारणी संचालक मंडळामध्ये सर्वानुमते निवृत्त प्राध्यापक डॉ. दिलीपजी एम. ललवाणी, कोटेचा महाविद्यालय भुसावळ यांची निवड करण्यात आली.
सदर कार्यक्रमात शासनाच्या नियमांचे पालन करत, फिजिकल डिस्टन्स, गर्दी टाळत आणि मास्क लावून किराणा साहित्य सोबतच मास्कचे सुद्धा वाटप करण्यात आले.
कार्यक्रमास उपप्राचार्य आर. जी. पाटील, उपप्राचार्य प्रा .डॉ. संजय भोळे, उपप्राचार्य प्रा. डॉ. श्याम साळुंखे, पारितोषिक वितरण समिती समन्वयक प्रा. डॉ . प्रशांत देशमुख,एन एस एस कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ. दिनेश पाटील, प्रा. महेश पाटील, प्रा. डॉ. भुषण पाटील, प्रा. डॉ. रोहिदास गवारे, सह कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ. वसंत पतंगे,विद्यार्थी विकास आधिकारी प्रा. डॉ. अजिनाथ जिवरग, प्रा. धम्मा धारगावे, कार्यालयीन अधिक्षक सतीश भाऊसाहेब बाविस्कर, प्रा.आप्पा महाजन, प्रा . प्रमोद सोनवने, तसेच शिक्षकेतर कर्मचारी श्री.संभाजी भिल ,श्री सुधीर गरुड,श्री. संदांशिव आप्पा, श्री. तडवी अप्पा, श्री. सतीश पाटील, श्री. मोहन पाटील, श्री. छोटू आप्पा, कॅंटीनचे श्री. विकास भोई , कमवा शिकवा चे विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. योगिता चौधरी,प्रास्ताविक प्रा. अमर जावळे, तर आभार माजी विद्यार्थी संघाचे सचिव श्री हितेंद्र कुमार गरुड यांनी मानले.